पाचव्या कसोटी सामन्यासाठी या स्फोटक खेळाडूची एंट्री.. ; इंग्लंडचा संघ जाहीर,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । भारताविरुद्धच्या पाचव्या आणि महत्वाच्या सामन्यासाठी इंग्लंडने आपाल संघ आता जाहीर केला आहे. यावेळी भारताची चिंता वाढवणाऱ्या खेळाडूची इंग्लंडच्या संघात एंट्री झाली आहे.

इंग्लंडच्या संघात पाचव्या कसोटीसाठी दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडच्या संघातील सर्वात मोठा बदल म्हणजे जोस बटलरला आता पाचव्या कसोटीसाठी संधी देण्यात आली आहे. बटलरने आतापर्यंत या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती, पण त्याची पत्नी गर्भवती असल्यामुळे त्याने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. बटलरच्या घरी आता कन्यारत्न आलं आहे. त्यामुळे आता बटलर हा संघाच्या कर्तव्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात बटलरला संधी देण्यात आली आहे. बटलरबरोबर जॅक लिचला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे. बटलर आणि जसप्रीत बुमरा यांच्यामध्ये या मालिकेत बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. हे प्रकरण चांगलेच पेटलेले होते. पण चौथ्या कसोटीत बटलर हा संघाबाहेर गेला आणि इंग्लंडच्या पदरी पराभव पडला. पण आता पाचव्या कसोटीसाठी बटलरचे इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *