महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ सप्टेंबर । ओला इलेक्ट्रिक दुचाकीपाठोपाठ या क्षेत्रात उतरण्यासाठी एलएमएल ही कंपनीही तयार झाली आहे. येणाऱया काळात कंपनी आपली इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणण्याच्या दृष्टीकोनातून योजना आखत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रामध्ये कंपनी आपले अस्तित्व अधिक गडद करण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. इतर कंपन्यांना टक्कर देण्याइतपत आपली इलेक्ट्रिक दुचाकी असेल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.