महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । ओल्ड ट्रॅफर्डचा रद्द झालेला पाचवा कसोटी सामना पुन्हा खेळवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) धोरणाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी स्वागत केले. २००८ मध्ये मुंबईवर २६/११चा दहशतवादी हल्ला झाल्यावर दौरा पूर्ण करण्यासाठी परतणाऱ्या इंग्लंडची कृती भारताने कदापि विसरू नये, असेही गावस्कर यांनी सांगितले. संघात करोनाचा उद्रेक झाल्यामुळे भारतीय संघाने खेळण्यास नापसंती दर्शवल्याने पाचवी कसोटी रद्द करण्यात आली. आता या सामन्याचे फेरआयोजन करण्यात येणार आहे. याबाबत गावस्कर म्हणाले, ‘‘२००८मधील अतिरेकी हल्ल्यानंतर इंग्लंडचा संघ दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला आणि काही दिवसांनी कर्णधार केव्हिन पीटरसनने सर्वाना राजी करून पुन्हा भारतात आणले होते.’’