जीवनशैलीतील बदल; अशी घ्या हृदयाची काळजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । आजचे तरुण धकाधकीचे जीवन जगत आहेत. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना अनेकदा मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. परिणामी तणाव, चिंता आणि नैराश्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. यासह जीवनशैलीतील बदल, व्यसनाधीनता, अपुरी झोप, पोषक आहाराची कमतरता या साऱ्या गोष्टी हृदयविकाराच्या समस्या वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

वर्क फ्रॉम होममुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. खूप जास्त काळासाठी एकाच जागी बसून राहणे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरत आहे. यामुळेही हृदयाच्या समस्या उद्भवत आहेत. तरुणांना हा आजार गंभीर स्वरूपात असल्यास अँजिओप्लास्टी किंवा शस्त्रक्रियेची गरज पडते. शरीरात होमोसिस्टिनचे प्रमाण जास्त असलेल्या तरुण रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते.

अनेक तरुणांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण यासारख्या व्याधी असतात. परंतु, ते त्याकडे दुर्लक्ष करतात. छातीत दुखणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, छातीत धडधडणे, दम लागणे आणि सतत घाम येणे यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा अपचनाची समस्या असेल असा गैरसमज करून या लक्षणांकडे टाळाटाळ करतात. यामुळे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच उपचारास विलंब झाल्यास जीव गमवावा लागू शकतो.

 

प्रत्येकाने नियमित शरीराची तपासणी करावी

ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, इको कार्डिओग्राफीचा करा

प्राथमिक चाचण्यांमध्ये दोष आढळल्यास अँन्जोग्राफी आणि इतर चाचण्या करा

रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाची तपासणी नियमित करा.

डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे नियमित हृदय तपासणी करून घ्या

 

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करावे लागेल. तणावग्रस्त असाल तर समुपदेशनाचा पर्याय निवडा आणि शांतपणे त्रास सहन करण्याऐवजी उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. आपले कुटुंब आणि मित्रांसह समस्यांवर चर्चा करून ताण कमी करा. तुम्हाला आवडणाऱ्या उपक्रमांमध्ये वेळ गुंतवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *