दोन महिन्यानंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता ; सौरव गांगुली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघासोबत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा मेंटॉर म्हणून जाणार असून २००७ नंतर आतापर्यंत संघाने कधीच टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघाने २००७ साली धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

पण केवळ या स्पर्धेपुरताच धोनी संघासोबत असणार आहे. भारतीय संघासोबत दिर्घ काळ धोनीला सपोर्टिंग स्टाफ म्हणून राहण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुलीने केला आहे. तसेच भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपत आहे. विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. म्हणजेच शास्त्री हे केवळ दोन महिन्यांसाठी भारतीय संघासोबत असणार आहेत.

टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौरव गांगुलीने धोनीच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली. केवळ टी-२० विश्वचषक स्पर्धेपुरता धोनी संघासोबत असणार आहे. बीसीसीआयला यासंदर्भातील माहिती धोनीने यापूर्वीच दिल्याचे गांगुलीने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भारताने सर्व टी-२० विश्वचषक स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वच आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. भारताला २०१३ नंतर एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताला शेवटी स्पर्धा ही धोनीच्या नेतृत्वाखालीच जिंकता आलेली. मुलाखतीमध्ये गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार अनेक देश आपल्या वरिष्ठ, माजी खेळाडूंची मदत घेतात. त्यामुळे संघाला फार फायदा होतो, असेही गांगुलीने म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील म्हणजेच टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपद टी-२० विश्वचषकानंतर सोडणार असल्याची चर्चा आहे. फलंदाजीवर विराटला लक्ष्य केंद्रित करायचे असल्यामुळे तो कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगण्यात येते. म्हणजेच टी-२० विश्वचषकानंतर संपूर्ण भारतीय संघच बदललेल्या स्वरुपात पहायला मिळणार आहे.

प्रशिक्षक रवि शास्त्रींसोबतच कोहलीही पद सोडणार असल्यामुळे भारताला ऑन आणि ऑफ द फिल्ड नवीन नेतृत्व मिळणार आहे. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील नेतृत्व रोहित शर्माकडे दिले जाण्याची चर्चा आहे. पण हे वृत्त बीसीसीआयने फेटाळून लावले आहे. रोहित शिवाय इतर कोणताही खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *