अखेर सॅमसंगचा ‘गॅलेक्सी एम31’ लाँच

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन गॅलेक्सी एम31 अखेर भारतात लाँच केला आहे. हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम30एसचे अपग्रेड आहे. सॅमसंगचा हा नवीन फोन 4 रिअर कॅमेऱ्यासह येतो. या फोनचा कॅमेरा आणि बॅटरी याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम31 ची किंमत –

कंपनीने हा स्मार्टफोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. याच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. लाँचिंग ऑफर अंतर्गत कंपनी यावर 1 हजार रुपये सुट देखील देत आहे. त्यामुळे सुरूवातीचे व्हेरिएंट 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन ओशन ब्लू आणि स्पेस ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. 5 मार्चपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम31 स्पेसिफिकेशन, फीचर्स –

ड्युअल सिम सॅमसंग गॅलेक्सी एम31 अँड्राईड 10 वर आधारित One UI 2.0 वर चालतो. यामध्ये 6.4 इंच फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) इनफिनिटी यू डिस्प्ले आहे. हा एक सूपर एमोलेड पॅनेल आणि आणि याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनस 9611 प्रोसेसर मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यात 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आहे. यात Samsung ISOCELL Bright GW1 सेंसरचा वापर करण्यात आला आहे. सोबतच 8 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा, 5 मेगापिक्सल मॅक्रो शटर आणि 5 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. यात इनहांस्ड बोकेह इफेक्टसाठी लाईव्ह फोकस फीचर देण्यात आलेले आहे. कंपनीने यात नाइट मोड, सुपर स्टेडी मोड आणि सुपर स्लो मो सारखे फीचर्स देखील दिले आहेत. यात फ्रंटला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. यात 4के व्हिडीओ रेकॉर्डिग करण्यास सक्षम आहे.

या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात 6,000 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे. कंपनीने यात 26 तास व्हिडीओ प्लेबॅक आणि 119 तास म्यूझिक प्लेबॅकचा दावा केला आहे. बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंगसोबत येते. कनेक्टिव्हिटीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम31 मध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *