रोज साठ मिनिटे हलक्या व्यायामाने मुलांमधील नैराश्य घालवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता अधिक असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘लॅन्सेट सायकिअ‍ॅट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जी किशोरवयीन मुले रोज साठ मिनिटे हलका व्यायाम करतात त्यांना नंतरच्या काळात नैराश्य जाणवत नाही. बाराव्या वर्षी जर त्यांनी हलका व्यायाम केला तर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण १० टक्के कमी राहते.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अ‍ॅरोन कांडोला यांनी म्हटले आहे, की जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण जास्त असते. बसून राहण्यापेक्षा काहीतरी शारीरिक हालचाली जी मुले करतात त्यांना पुढच्या आयुष्यातही त्याचा फायदा होतो. ४२५७ किशोरवयीन मुलांचा अभ्यास यात करण्यात आला, त्यानुसार जी मुले १२,१४, १६ या वयात आठवडय़ाला तीन दिवस १० तास शारीरिक हालचाली करीत असत त्यांच्यात नैराश्य कमी दिसून आले. यात फार मोठय़ा व्यायामाची आवश्यकता नसते तर साध्या शारीरिक हालचाली गरजेच्या असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *