Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घट ; तपासा लेटेस्ट गोल्ड रेट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ सप्टेंबर । बुधवारी सोने दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबर गोल्ड वायदे भाव 75 रुपयांनी खाली आला असून 47,185 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याआधीच्या सत्रात गोल्ड रेट 47,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. बुधावारी सकाळी MCX वर सोने दर 47,241 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.

सोन्याप्रमाणे आज चांदी वायदे भावही घसरला आहे. MCX वर डिसेंबर चांदी वायदे भाव 187 रुपयांची कमी होवून 63,398 रुपये प्रति किलोग्रॅमवर सुरू झाला. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 63,585 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगानिस्तानातील परिस्थितीचा परिणामही सोने दरावर होवून सोने दरात वाढ होऊ शकते. वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *