Tata CNG Car : टाटाची स्वस्त आणि मस्त सीएनजी कार ; करा पाच हजारात बुकिंग

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच कार चालविणे अशक्य झाले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचे बजेट पूर्ण बिघडले आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार खरेदी करण्यावर भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची मागणी वाढली आहे. (Tata’s cheap and cool CNG car)

त्यामुळे अनेक कार कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून सीएनजी व्हर्जनमध्ये आपल्या कार आणत आहेत. आता देशातील प्रमुख ऑटो कंपनी टाटा मोटर्स आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने नवीन Tiago CNG साठी बुकिंग स्वीकारण्यास देखील सुरूवात केली आहे. केवळ पाच हजार रुपयांत बुकिग करता येऊ शकते. दिवाळीपर्यंत टाटा मोटर्सची नवीन Tiago CNG लॉन्च होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सची (Tata Motors) नवीन Tiago CNG ही कार टेस्टिंग दरम्यानही नजरेत आली. त्यावेळी Tata Tiago CNG कारच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती लीक झाली आहे. त्यानुसार, कंपनीने ही नवीन सीएनजी कार सध्याच्या टियागोपेक्षा वेगळी दिसावी यासाठी एकदम नवीन बंपर, क्रोमसह नवीन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डीआरएल (LED DRL), आकर्षक एलईडी टेल लाइट्स असे फिचर्स दिले आहेत.

तसेच अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होणारी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायपरसह रिअर डिफॉगर असे फीचर्सही या कारमध्ये मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा टियागो सीएनजीमध्ये (Tata Tiago CNG) 1.2 लिटर रेवोट्रॉन इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असेल. मार्केटमध्ये सध्या विक्री होत असलेली टियागो ही सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार असल्याचा कंपनी दावा करते.

मार्केटमध्ये सध्या विक्री होणाऱ्या Tata Tiago कारला NCAP ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहेत. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल असे फिचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *