महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । कोरोनाची दूसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे गोव्यात गेले 5 महीने बंद असलेले कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रूज सोमवारपासून 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. या ठिकाणी जाणाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याबाबतची नियमावली लवकरच जारी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ईडीएम पार्ट्या, नाईट क्लब यांना तूर्तास परवानगी दिलेली नाही. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय कृतिदलाच्या पुढील बैठकीनंतर घेतला जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळेच सरकारने कृतिदलाच्या शिफारशीनुसार पर्यटनाशी संबंधित उद्योग, व्यवसायासाठी नियमावली जारी करून ते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच सोमवारपासून कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रूज 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत.