Dombivli Gang Rape : ’33 राक्षसांना फाशी द्या, नाहीतर गुप्तांग कापा’, मनसे चा आक्रमक पवित्रा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । प्रतिनिधी । डोंबिवलीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त करत, नरधमांना फाशी देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतील असून नरधामांना फाशीची शिक्षा द्या अथवा त्याचं गुप्तांग कापा अशी मागणी केली आहे.

तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून अशी मागणी करणारा बॅनर देखील लावण्यात आला आहे. मनसेचे कोपारी पाचपाखाडी विभागाचे अध्यक्ष महेश कदम यांनी चंदनवाडी याठिकाणी बॅनर लावून 33 राक्षसांना फाशी देण्याची मागणी केली आहे. संबंधित बॅनरमध्ये 33 नराधमाचा प्रतिकात्मक फोटो म्हणून 33 तोंडी राक्षसाचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच ‘डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 33 राक्षसांना फाशी द्या, नाहीतर त्याचं गुप्तांग कापा’ अशी मागणी संबंधित बॅनरमधून करण्यात आली आहे. याप्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *