संयुक्त किसान मोर्चा च्या भारत बंद ला संभाजी ब्रिगेड व शेतकरी क्रांती समितीचा जाहीर पाठिंबा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । उस्मानाबाद प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब:-केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशातील शेतकरी आणि शेती आधारित लोक देशोधडीला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या हितांच्या रक्षणार्थ संभाजी ब्रिगेड सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

विद्यमान केंद्रसरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भांडवलदार धार्जिने धोरण राबवित असल्यामुळे कृषिप्रधान देशातील शेतकरी देशोधडीला लागलेआहेत. केंद्रसरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत तसेच, शेतकऱ्यांची पिळवणूक आणि भांडवलदारांशी हात मिळवणी हे गलिच्छ धोरण थांबवावे अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

त्याचे होणाऱ्या परिणामांस सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल असा इशाराही संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आणि शेतकरी क्रांती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. कळंब येथील मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी,कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कवडे,विभागीय उपाध्यक्ष विलास गुठांळ जिल्हा संघटक विकास गडकर पाटील, प्रा.तुषार वाघमारे, आण्णासाहेब मिसाळ, अशोक कांबळे, किसान मोर्चा चे बाबासाहेब कोठावळे, अशोक जगताप, छावा चे जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील छञपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कळंब तालुका अध्यक्ष इम्रान मिर्झा,मनोज पाटील, बालाजी नाईकनवरे रमेश रितपूरे अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *