गुगल चे जबरदस्त फिचर ; ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप देणार स्पीड अॅलर्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । गुगल मॅप आता ड्रायव्हिंग करताना स्पीड अलर्ट देणार आहे. ड्रायव्हरने वेग मर्यादा ओलांडली तर त्याला सतर्क करणार आहे. गुगलने गुगल मॅप्ससाठीचे स्पीड लिमिट वार्ंनग फीचर डिझाईन केले आहे. ड्रायव्हिंग करताना युजरचा स्पीड किती आहे, हे स्क्रीनवर या फीचरद्वारे दिसेल.

‘स्पीड लिमिट वार्ंनग फीचर’साठी युजरकडे गुगल मॅप्सचे लेटेस्ट वर्जन असणे गरजेचे आहे. गुगल मॅप्स ओपन करून प्रोफाईल फोटो टॅप करून सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर नेव्हिगेशनवर क्लिक करून ड्रायव्हिंग पर्यायावर जा. स्पीड लिमिट आणि स्पीडोमीटर ऑन करा आणि गुगल मॅप्सच्या मेन स्क्रीनवर परत जा. त्यानंतर आता कार चालवताना गुगल मॅप्सवर स्पीड तपासता येईल. गुगल मॅप्सचे हे फीचर स्पीड लिमीट सांगत असले तरी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. यातील डेटा चुकीचा किंवा जुना असू शकतो. त्यामुळे या फीचरवर निर्भर राहणं नुकसानकारक ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *