Horoscope : आज या राशींच्या व्यक्तींवर देवी ची कृपा ; पहा आजचे राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर ।

मेष
आज आपल्या रागीट स्वभावाला काबूत ठेवून काम करा. आज लाभदायक घटना घडतील. जोडीदाराला उत्तम आर्थिक लाभ होईल. दिवस चांगला आहे. आरोग्य ठीक राहील .

वृषभ
आज मध्यम जाईल . काही जणांना प्रकृती अस्वस्थ वाटेल. पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति खर्च टाळा. दिवस मध्यम .

मिथुन
आज दिवस उत्तम आहे . कामात आणि शिक्षणात प्रगती होईल. प्रकृती अस्वस्थ वाटत असेल तर आज जपून रहा. खर्च वाढेल. मुलांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. शक्ति आराधना करावी.

कर्क
आज दिवस चांगला जाईल . धुसफूस वाढवत असेल पण शांत रहा. लवकरच सगळे ठीक होईल. जोडीदाराला फायदा होईल . घरातल्या शुभ घटनांची सुरवात. दिवस अनुकूल आहे.

सिंह
आज कुटुंब ही तुमची प्राथमिकता आहे. आज दिवस समाधानात जाईल. राशीच्या धनस्थानातील मंगळ आणि तृतीय चंद्र प्रवास घडवतील. इच्छा पूर्ती होईल. दिवस चांगला आहे.

कन्या
आज आर्थिक घडामोडी होतील कुटुंबियांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच उत्साही असतो. आजही दिवस तसाच आहे. चांगले फळ मिळेल.

तुला
आज दिवस चांगला जाईल . धावपळीमुळे आरोग्य बिघडलेले असू शकेल. घरातली विजेची उपकरणे सांभाळून वापरा दुरुस्ती निघू शकते. प्रकृती जपा.प्रवासात काळजी घ्या .

वृश्चिक
आज दिवस माध्यम आहे . व्यय स्थानातील चंद्र ,मतभेद, कुरबुरी घडवून आणतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय घ्या. अचानक छोटा प्रवास संभवतो. जरा जपून रहा.

धनु
आज दिवस जरा वादग्रस्त ठरू शकतो मित्रांशी वाद करु नका. नोकरी व्यवसायातून लाभ संभवतात. मात्र सरळ मार्गाने जा. साडेसाती असली तरी गुरुकृपेने मार्ग निघेल. जगदंबेचा उदो उदो.

मकर
राशी स्थानात मार्गी गुरू महाराज शुभ फळ देतील. आप्तेष्टांना नाराज करू नका. त्यांना महत्त्व द्या. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. दिवस चांगला आहे.

कुंभ
आज दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे प्रवास योग येतील. भाग्य साथ देईल. शत्रू पिडा संभवते. पण विजय तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही धार्मिक कामात मन रमेल.

मीन
आज जरा जपून राहावे असे ग्रहमानआहे .एकाग्र राहून काम करा. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची ठरेल. यश मिळेल पण प्रयत्नाने. संतती कडे लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम आहे. जगदंबा प्रसन्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *