Maharashtra Band Today: लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं (Maharashtra Bandh 2021) आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.

केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंदमध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये ‘बंद’ यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन शाखांना केले आहे, अशी माहिती किसान सभेनं दिली आहे. ‘जनतेनं या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *