महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 6 बॉलमध्ये नाबाद 18 रनची खेळी केली. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सीएसकेनं (CSK) आयपीएल फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला. रविवारी झालेल्या मॅचमध्ये बऱ्याच दिवसांनी धोनीची जुनी फटकेबाजी पाहयला मिळाली.
धोनीची फटकेबाजी पाहताना फॅन्सच्या उत्साहाला उधाण आले होते. त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली साक्षी चांगलीच भावुक झाली होती. माहीची ही खेळी पाहून साक्षी देखील खूश झाली होती. तिनं यावेळी तिची मुलगी झिवाला (Ziva Dhoni) मिठी मारत याचा आनंद साजरा केला. या आयपीएल स्पर्धेत संथ खेळीबद्दल धोनीवर सातत्यानं टीका होत होती. त्या परिस्थितीमध्ये धोनीनं फटकेबाजी करत चेन्नईला फायनलमध्ये नेल्यानं साक्षीला अश्रू आवरता आले नाहीत.