चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने चालू करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्यासाठी निश्‍चित केलेल्या नियमावलीत बदल करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता.१३) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यासाठीच्या अटी खूप त्रासदायक ठरणाऱ्या असल्याचे डॉ. कोल्हे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

राज्य सरकारचा हा निर्णय स्तुत्य आहे, परंतु सरकारने याबाबत केलेल्या नियमावलीत ५० टक्के क्षमतेनेच चित्रपट आणि नाट्यगृहे चालविण्याचे बंधन घातले आहे. यामुळे प्रत्येक दोन प्रेक्षकांमधील एक आसन रिकामे सोडावे लागणार आहे.

हा नियम चित्रपटगृह चालकांच्या मुळावर घाव घालणारा ठरणार आहे. ऩाटक आणि चित्रपट हे दोन्ही विषय हे कौटुंबिक मनोरंजनाचे साधन आहेत. मात्र याबाबतच्या जाचक अटीमुळे सहकुटुंब नाटक किंवा चित्रपट पाहायला जाणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. हे चित्रपटगृह चालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या कुटुंबांना चित्रपटगृहात एकाआड आसनाऐवजी सलग बसण्याची परवानगी द्यावी आणि ५० टक्के क्षमतेऐवजी ही चित्रपटगृहे व नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणीही कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *