महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. आज देशभरात पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. या आधी सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली होती तर मंगळवारी आणि बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते.
या दरवाढीने आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.७५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०४.७९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.१० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०५.४३ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११३.३७ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १०८.४४ रुपये झाले आहे.
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०१.४० रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९३.५२ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत ९७.९३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९६.६३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०२.६६ रुपये असून बंगळुरात डिझेल ९९.२६ रुपये आहे.