![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । उत्सव काळात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. आज बुधवारी सराफा बाजारात सोने २५० रुपयांनी महागले. चांदीमध्ये ३५० रुपयांची वाढ झाली. सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. कमॉडिटी बाजारात सोने तब्बल ६०० रुपयांनी तर चांदी ११०० रुपयांनी महागली.
कमॉडिटी बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने २४० रुपयांनी तर चांदीमध्ये ३०० रुपयांनी महागले होते. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७८२८ रुपये आहे. त्यात ६३० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा भाव ६२७४० रुपये आहे. त्यात ११५४ रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी चांदीचा भाव ६२८९८ रुपयांपर्यंत वाढला होता.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२९० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७२९० रुपये आता वाढला. त्यात २६० रुपयांची वाढ झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५१० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४४४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८४८० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये इतका वाढला आहे.