सोन्याचे भाव वाढले, चांदीसुद्धा महागली; पटापट तपासा ताजे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । Silver, Gold Price Today: राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी सोन्याचे दर 455 रुपयांनी वाढून 46,987 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, जागतिक बाजारात सोन्याचा जोरदार कल आहे. यापूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति 10 ग्रॅम 46,532 रुपयांवर बंद झाले होते. याशिवाय चांदीही 894 रुपयांनी वाढून 61,926 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात चांदी 61,032 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,795 रुपये प्रति औंस होती आणि चांदी 23.20 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्स ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किमती 0.12 टक्क्यांनी वाढून 1,795 डॉलर प्रति औंसवर आहेत. ते पुढे म्हणाले की, कमकुवत डॉलर आणि महागाईच्या चिंतेमुळे सोन्याच्या किमती मजबूत व्यापार श्रेणीत राहिल्या. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत, ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *