Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gadar 2 मधून सनी देओल पुन्हा चित्रपटात झळकणार, लवकरच पोस्टर लाँच - Maharashtra 24

Gadar 2 मधून सनी देओल पुन्हा चित्रपटात झळकणार, लवकरच पोस्टर लाँच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । बॉलीवुडचे सुपरस्टार सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून त्यांचा कोणताही चित्रपट झळकलेला नाही. मात्र आता लवकरच मोठ्या पडद्यावर त्यांची दमदार एंट्री होणार आहे, अशी चर्चा होती. त्यावर सनी देओल यांनी स्वत:च शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमधून स्पष्ट होत आहे की बड्या पडद्यावर झळकण्यासाठी त्यांनी आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल निवडला आहे. सनी देओल यांनी त्यांचा सुपरहिट चित्रपट गदरची घोषणा केली आहे. 15 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात आणखी काही माहिती समोर आणली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव देखील अजून समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *