पुणेकरांसाठी खूशखबर ! म्हाडाची ३ हजार घरांची निघणार Lottery

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑक्टोबर । पुणे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तसेच मोठं आयटी हब असल्याकारणाने पुण्यात देशभरातून अनेक लोक नोकरी-शिक्षणासाठी येत असतात. पुण्यात आलेल्या या लोकांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात आलेल्या या लोकांचं घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. पुण्यात जर तुम्ही घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून म्हणजेच पुणे म्हाडाकडून (Pune Mhada) आता घरासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. याचं कारण असं आहे की, दिवाळीच्या मुहूर्तावर (Pune Mhada Lottery 2021) 3000 हून जास्त घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती फारच बिघडली आहे. अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीय आणि गरिबांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. मागच्या वर्षी कोरोना काळातदेखील जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्यावतीने तब्बल 5657 घरांची सोडत काढण्यात आली होती. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात आली होती. त्यानंतर म्हाडाने प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 2500 घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी 3000 हून जास्त घरांसाठी लॉटरी काढत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *