राज्यात वीजसंकट गंभीर, कोळसा साठा घसरला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑक्टोबर । Power crisis : राज्यात वीजसंकट गंभीर होत चालले आहे. त्यामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण उपलब्ध कोळसा साठा घसरला आहे. यामुळे वीज निर्मितीवर याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. (Power crisis severe in Maharashtra , Available coal stocks Slipped)

वीजनिर्मितीसाठी उपलब्ध कोळसा साठा घसरल्याने औष्णिक वीजनिर्मिती 4800 मेगावॅटपर्यंत घसरली आहे. 1.38 लाख टनापर्यंत कोळसा साठा घसरला आहे. राज्य सरकारी महानिर्मितीसमोरील कोळसाटंचाईचे संकट सरता सरत नाही अशी परिस्थिती आहे.

उपलब्ध कोळशाचा साठा 1.38 लाख टनापर्यंत घसरला आहे. यामुळे 28 हजार 89 टन इतका कोळसाच वीजनिर्मितीयोग्य होता. उर्वरित कच्चा कोळसा असून, तो धुवून निघाल्यावरच निर्मितीयोग्य होईल. त्यामुळे औष्णिक वीजनिर्मितीवर आता बंधन असणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *