महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । नाशिक । सोन्याचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत. नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49300 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46060 रुपये नोंदवले गेले.
नाशिकच्या सराफा बाजारात 1 सप्टेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. मात्र, आता या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48870 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 45630 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी यात किरकोळ वाढ होत 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48880 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 45640 रुपये नोंदवले गेले. शनिवारी या भावात वाढ होत 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49290 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46050 रुपये नोंदवले गेले. रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49300 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46060 रुपये नोंदवले गेले.