महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरात इंधनाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 35-35 पैशांची वाढ केली आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.15 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.23 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.34 आणि 98.07रुपये इतका आहे.