महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । दिवाळीच्या पहिल्या आणि दुसर्या दिवशी राज्यातील काही भागांत पावसाला सुरुवात होत असून कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 1 व 2 नोव्हेंबरला यलो अॅलर्ट जारी (weather forecast) करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागांत शुक्रवारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल. त्यापुढे दिवाळीच्या पहिल्या व दुसर्या दिवशी 1 व 2 नोव्हेंबरला कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अॅलर्ट हवामानशास्त्र विभागाने (weather forecast) दिला आहे.
दरम्यान, राज्यात ज्या भागात पावसाचा इशारा दिला आहे, त्या भागातील किमान तापमानात घट झालेली नाही. यात कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत.