फिल्मीदुनिया : दिवाळीपासून नववर्षापर्यंत या 10 चित्रपटांत स्पर्धा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । दिवाळीपासून बॉलीवूडमध्ये मोठी स्पर्धा सुरू होत आहे. ५ नोव्हेंबर राेजी दिवाळीपासून बिग स्टारर चित्रपटांची रांग लागेल. ही पुढील ५६ दिवस म्हणजे नव्या वर्षापर्यंत सलग चालेल. यादरम्यान १० मोठे चित्रपट प्रदर्शित होतील. बॉलीवूड आणि चित्रपटगृह मालकांना या चित्रपटांपासून अपेक्षा आहेत. दुसरीकडे, उत्पन्न निश्चित करण्यासाठी या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर गळेकापू स्पर्धा करावी लागेल. दिवाळीनिमित्त म्हणजे ५ नोव्हेंबरपासून अक्षय कुमारचा चित्रपट “सूर्यवंशी’ प्रदर्शित होत आहे. या दिवशी गुलशन ग्रोव्हर आणि शरद कपूरचा चित्रपट “नो मीन्स नो’ही प्रदर्शित होत आहे.

रोहित शेट्‌टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’कडे आपला अंदाजे खर्च १७५ कोटींहून अधिक कमाईसाठी केवळ १४ दिवसच मिळतील. कारण १९ नोव्हेंबरला सैफ अली खान आणि राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला ‘बंटी बबली-२’ प्रदर्शित होईल. या चित्रपटाला ६ दिवसांनंतर २५ नोव्हेंबर रोजी टक्कर देण्यासाठी जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते-२’ प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे याच दिवशी सलमान खानचा ‘अंतिम-द फायनल ट्रूथ’ ही प्रदर्शित होणार आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात सलमान खान आणि जॉन अब्राहम यांच्यातही बॉक्स ऑफिसवर टक्कर दिसून येईल. यानंतर डिसेंबरमध्येही मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सुनील शेट्‌टीचा मुलगा अहानचा पहिला चित्रपट ‘तड़प’ आणि भारताच्या पहिल्या क्रिकेट वर्ल्डकप विजयावर बनलेला रणवीर सिंगचा ‘८३’ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय ‘चंडीगढ करे आशिकी’, ‘पुष्पा’, आणि ‘जर्सी’ ही डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतील रस्सीखेचमध्ये कोणीही पुढे राहो, फायदा मात्र बॉलीवूडला नक्कीच होईल. िचत्रपटगृहांत प्रेक्षक परत येणे आणि मोठ्या पडद्यावर कमाई सुरू होणे, हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी संजीवनी ठरणार आहे. बॉलीवूडला या चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत. कारण या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादच नवीन वर्षात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे भवितव्य निश्चित करणार आहे.

चित्रपट समीक्षक योगेश मिश्रा यांच्या मते, रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट यंदा गेमचेंजर ठरणार आहे. ते म्हणाले, २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडली आहेत. यादरम्यान बबलू बॅचलर, भवाई आणि बेखुदीसारखे चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकले. या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई किती हे स्पष्ट झालेले नाही. मल्टिप्लेक्स चेनच्या आयनॉक्सशी संबंधित सूत्रांनुसार, दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होत असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग हे चांगले लक्षण आहे. आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक बुकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *