‘लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने (Mumbai local train) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लसवंत असलेल्या म्हणजेच कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) घेऊन 15 दिवस झालेल्या सर्व नागरिकांना आता लोकल ट्रेनचं तिकीट (Mumbai Local Train Ticket) मिळणार आहे. या संदर्भातील पत्रही राज्य सरकारने (Maharashtra Government) रेल्वे बोर्डाला लिहिले आहे. यापूर्वी दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांना केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता लोकलचं दैनंदिन तिकीट नागरिकांना मिळणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच यापूर्वी लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानतंर 15 ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मात्र, त्यांना तिकीटाऐवजी मासिक पास घ्यावा लागत होता. पण आता राज्य सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या नागिरकांना दैनंदिन तिकीट मिळावे यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने रेल्वेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी रेल्वे स्थानकावर तैनात करावेत. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरीकच पास किंवा तिकीट घेत आहेत का याबाबतची तपासणी करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *