महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा (How to celeberate Diwali with kids) सण आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मात्र दिवाळीवर कोरोनाचं सावट आहे. पर्यावरण रक्षणासाठी अनेकजण दिवाळीत फटाके न फोडण्याचा निर्णय स्वतःहून घेतात. तर सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतच दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीच्या आनंदात मुलांनाही सहभागी करून घेता आलं, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. हे उपाय केले, तर मुलंदेखील आपल्यासोबत दिवाळीचा आनंद लुटू शकतील.
दिवाळी का साजरी केली जाते, याचं कारण मुलांना सांगणं गरजेचं आहे. दिवाळीचे रामायणाशी संबंधित असणारे मुद्दे आणि इतरही कारणं त्यांना सांगा. दिवाळीच्या कारणांबाबत माहिती देणारी पुस्तकं त्यांना आणून द्या. आपण ज्या गोष्टी सेलिब्रेट करतो, त्याचं कारण त्यांना मुळापासून समजलं, तर त्याचा अधिक आनंद ते लुटू शकतील.
मुलांना रांगोळी काढायला आवडतं. दिवाळी आणि रांगोळी यांचं घनिष्ट नातं आहे. मुलांना वेगवेगळ्य
रंगाची रांगोळी आणून द्या आणि त्यांना रांगोळी काढायला मदत करा. त्यामुळे मुलांचा आनंद वाढेल आणि तुमच्यासोबत तेदेखील दिवाळीचा आनंद लुटू शकतील.
मुलांना माती आणि मातीची खेळणी आणून द्या. मातीच्या गोळ्यापासून वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी बनवण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलांचं कौशल्यही वाढेल. या भांड्यांना रंग देऊन ती रोजच्या वापरात आणण्याचा प्रयत्न करा. मुलांनी दिवे बनवले तर त्यात तेल आणि वात घालून ते घरात लावा.
एकत्र फराळ बनवा
दिवाळीतील फराळाचे पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करून घ्या. त्यामुळे मुलांची तुम्हाला मदतही होईल आणि त्यांनाही पदार्थ बनवल्याचा आनंद होईल.