आफ्रिकेच्या मार्गात इंग्लंडचा अडथळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ नोव्हेबर । मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ, ही ओळख पुसण्यासाठी उत्सुक असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात अनपेक्षित कामगिरी केली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी ते बलाढ्य इंग्लंडला मोठ्या फरकाने धूळ चारू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्यामुळे शनिवारी पराभवाची नामुष्की ओढवली तरी त्यामधील अंतर मोठे नसेल, याकडे फक्त इंग्लंडला लक्ष द्यवे लागेल. चार सामन्यांत तीन विषयांचे सहा गुण नावावर असलेल्या आफ्रिकेला मात्र इंग्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्याबरोबरच अन्य लढतीत ऑस्ट्रेलिया पराभूत व्हावी, यासाठी साकडे घालावे लागणार आहेत.ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघात जोस बटलर, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज असून मोईन अली, आदिल रशीद या फिरकीपटूंची जोडी त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. टायमल मिल्स मात्र दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर गेल्याने इंग्लंडला याचा फटका बसू शकतो.आफ्रिकेसाठी कर्णधार तेम्बा बव्हूमा, क्विंटन डीकॉक, रासी व्हॅन दर दुसेन आणि एडिन मार्करम हे फलंदाज महत्त्वाचे असून डेव्हिड मिलर अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए यांची वेगवान जोडी आणि तबरेझ शम्सी, केशव महाराज हे फिरकीपटू इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवू शकतात.

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्र्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *