महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या वर्ल्ड कपमधील सेमी फायनलच्या 3 टीम ठरल्या आहेत. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तानची (Pakistan) टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. आता सेमी फायनलच्या चौथ्या स्थानासाठी भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात स्पर्धा आहे. न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) या रविवारी होणाऱ्या मॅचनंतर चौथ्या टीमचं चित्र स्पष्ट होणार आहे.
न्यूझीलंडनं ही मॅच जिंकली तर ती टीम 8 पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये दाखल होईल. त्याचबरोबर सलग दोन दमदार विजयासह स्पर्धेत पुनरागमन केलेल्या टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल. पण अफगाणिस्ताननं ही मॅच जिंकली तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यासाठी टीम इंडियाला सोमवारी नामिबिया विरुद्ध होणारी मॅच योग्य रनरेटसह जिंकावी लागणार आहे. त्यामुळे या मॅचकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
अफगाणिस्तानची स्पिन बॉलिंग धोकादायक आहे. त्यातच गेली दोन मॅच खेळू न शकलेला मुजीब उर रहमान ही परतणार असल्याचं वृत्त असल्यानं अफगाणिस्तानला मोठा दिलासा मिळला आहे. मुजीबसह राशिद खान आणि मोहम्मद नबी हे स्पिनर्स न्यूझीलंडची डोकेदुखी ठरू शकतात. न्यूझीलंडच्या टीमनं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर सलग तीन मॅच जिंकल्या आहेत. पण, अफगाणिस्तान विरुद्ध पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.