महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) वेस्ट इंडिजचं (West Indies) आव्हान संपुष्टात आलं आहे. शनिवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं (Australia vs West Indies) त्यांचा 8 विकेट्सनं पराभव केला. वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होची (Dwayane Bravo) हा शेवटचा सामना होता. पण मॅच संपल्यानंतर आक्रमक बॅटर ख्रिस गेल (Chris Gayle) ज्या पद्धतीनं मैदानाच्या बाहेर गेला ते पाहाता त्यानंही शेवटचा टी20 इंटरनॅशन मॅच खेळल्याचं मानलं जात आहे.
ख्रिस गेल 15 रन काढून आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना त्यानं बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केलं. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गेलची गळाभेट घेत त्याचं स्वागत केलं. गेलनं यावेळी फॅन्सना त्याचं क्रिकेटचं साहित्य देखील दिलं. इतकचं नाही तर मॅच संपल्यानंतर गेल आणि ब्राव्हो यांना दोन्ही टीमच्या खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देखील दिलं. या सर्व गोष्टी पाहाता गेलची वेस्ट इंडिजकडून ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच आहे, असं मत कॉमेंटेटर आणि वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयन बिशप यांनी व्यक्त केलं.
गेलनं मॅच झाल्यानंतर आपण निवृत्तीची घोषणा का केली नाही, याचं कारण सांगितलं. ‘मी शेवटच्या मॅचमध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न केला. हा वर्ल्ड कप टीमसाठी आणि आमच्यासाठी निराशाजनक ठरला. हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा होता. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी आणखी बरंच काही करणे बाकी आहे. अनेक नवे खेळाडू समोर येत आहेत. मी त्यांच्या सहाय्यकाची भूमिका बजावू शकतो. मी अजून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्यांनी मला संधी दिली तर मी माझ्या होमग्रांऊडवर जमैकामध्ये एक मॅच खेळण्याची माझी इच्छा आहे. तुमचे आभार, पण मी आत्ता निवृत्तीची घोषणा करू शकत नाही.