विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार, वाचा नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । कोरोना काळात (Coronavirus in Maharashtra) करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) आणि इतर नियमांमुळे गेल्या दीड वर्षात पंढरपुरमध्ये सहा मोठ्या यात्रा झालेल्या नाहीत. या काळात कोट्यवधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. मात्र, आता विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 महिन्यांनंतर आता विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार आहे. वारकरी संप्रदायासाठी आषाढी कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो. हीच कार्तिकी यात्रा (Kartiki Ekadashi in Pandharpur) भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.

प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सादर केलेला प्रस्ताव आणि मंदिर समितीने यात्रा भरविण्यास दाखवलेली अनकुलता यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता दिली आहे. सध्या देशासोबतच राज्यातही कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून ही यात्रा भरविण्यास दिली परवानगी देण्यात आली. यामुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तब्बल दीड वर्षानंतर विठ्ठल भक्तांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या हस्ते महापुजा, भाविकांचे दर्शन, नैवेद्य, रथोत्सव, महाद्वारकाला , पंढरपूरमध्ये येणाऱ्या दिंड्यांचे नियोजन, मठामध्ये उतरणाऱ्या भाविकांसाठीचे नियोजन, वाळवंटातील परंपरा, स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा याबद्दल सविस्तर सुचेना आदेशात देण्यात आले आहेत. यात्रा भरविण्यास परवानगी देण्यात आल्याने पंढरपूरच्या अर्थचक्राला पुन्हा एकदा चालना मानले आहेत. या निर्णयासाठी व्यापारी कमिटीने जिल्हाधिकार्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *