‘सूर्यवंशी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमघ्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. पण करोना काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने किती कमाई केली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई…

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे सांगितले आहे. ‘महाराष्ट्रात चित्रपटगृहे ५० टक्के उपस्थित सुरु करण्यात आली असून देखील सूर्यवंशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, पहिल्याच दिवशी चित्रपटाने २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे’ या आशयाचे ट्वीट तरण आदर्श यांनी केले आहे.

तसेच चित्रपटाने जगभरात पहिल्याच दिवशी ८ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशात ३,५०० स्क्रीन्सवर आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रात ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटासोबत हॉलिवूड चित्रपट एटर्नल्स देखील प्रदर्शित झाला होता. पण सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *