Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व काय?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि परंपरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ नोव्हेबर । कार्तिक महिना हिंदू धर्मासाठी खूप खास असतो. या महिन्यात अनेक सण असतात. आता दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ‘कार्तिक पौर्णिमेला’ साजरी केली जाते, कार्तिक पौर्णिमेला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमा यावर्षी शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी होत आहे.धार्मिक शास्त्रानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला गंगास्नानाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचा ८वा महिना कार्तिक महिना आहे.

@ शास्त्रात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व सांगितले आहे, या पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते.

@ विष्णूच्या भक्तांसाठीही हा दिवस खूप खास आहे, खरं तर भगवान विष्णूचा पहिला अवतार याच दिवशी झाला होता. पहिल्या अवतारात भगवान विष्णू मत्स्य म्हणजेच माशाच्या रूपात होते. म्हणून या सणाचे जास्त महत्त्व आहे.

@ या दिवशी भगवान शंकरानी त्रिपुरासुर नावाच्या महान असुराचा वध केला होता. तेव्हापासून भोलेनाथला त्रिपुरारी असेही म्हणतात.भगवानांनी राक्षसाचा वध केल्यावर देवता खूप प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूने शिवाचे नाव त्रिपुरारी ठेवले, जे शिवाच्या अनेक नावांपैकी एक आहे.

@ शीख धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस विशेष आहे, या दिवशी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचा जन्म झाला होता. या दिवशी शीख धर्मातील सर्व लोक दिवाळीप्रमाणे दिवे लावतात याला गुरु पर्व असेही म्हणतात.

@ कार्तिक पौर्णिमा हा सण दिवाळीप्रमाणे संध्याकाळी दिवा लावून साजरा केला जातो. एवढेच नाही तर या दिवशी गंगास्नान, दीपदान, इतर दान आदींचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक घरात दिवे लावतात.

@ या दिवशी आकाशात चंद्र उगवतो तेव्हा भगवान शिव प्रसन्न होतात आणि शिव, संभूती, संती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा या सहा कृतिकांचं पूजन करून प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *