महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ नोव्हेबर । महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्याप संपलेला नाही. आंदोलनामुळे एसटी कामगार कामावर न परतल्यानं प्रवाश्यांची मोठी गैरसोय निर्माण झाल्याचं दिसून आले आहे. शहरातील स्वारगेटबस आगारात आजही एकही बस आलेली नाही. पुण्यातील स्वारगेट डेपोबाहेर आंदोलन सुरूच आहे. या डेपोतून लांबपल्ल्याच्या कोणत्याही गाड्या आलेलया नाहीत. तसेच यामुळे प्रवाश्यांची तारंबळ उडाली आहे. दूरच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवासी अद्यापही स्थानकातच अडकून पडले आहेत. तर जिल्हातंर्गत प्रवासाच्या बसेसही आगारातून बाहेर पडलेल्या नाहीत. स्वारगेट शिवाजीनगरसह शहरातील 13बस डेपोतील एसटीची वाहतूक पूर्ण बंद आहे.