टी-२० वर्ल्डकप २०२२ : ICCची मोठी घोषणा ; फायनल, सेमीफायनलच्या तारखा आणि ठिकाण जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६नोव्हेंबर । २०२१ सालचा टी-२० वर्ल्डकप संपूण फक्त दोन दिवस झाले आहेत आणि आयसीसीने पुढील वर्षी म्हणजे २०२२ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप संदर्बात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. २०२२ सालचा टी-२० वर्ल्डकप विद्यमान विजेते ऑस्ट्रेलियात होणार आहे. या स्पर्धेतील सर्व लढती सात शहरात आयोजित केल्या जाणार असून त्याची नावे आणि तारखा आयसीसीने जाहीर केल्या आहेत.

मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन, पर्थ, एडिलेड, होबार्ट आणि जीलांग या सात शहरात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात टी-२० वर्ल्डकपमधील सामने होतील. फायनल मॅच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात स्पर्धेतील ४५ सामने होतील. सेमीफायनलच्या लढती सिडनी आणि एडीलेड येते अनुक्रमे ९ आमि १० नोव्हेंबर रोजी होतील. या स्पर्धेसाठी ज्या १२ देशांनी थेट प्रवेश केला आहे. त्यात विद्यमान विजेते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा देखील समावेश आहे. या शिवाय अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पात्रता फेरी खेळावी लागले.

पात्रता फेरीत अन्य चार संघ कोणते असतील याचा निर्णय फ्रेब्रुवारी महिन्यात ओमान येथे आणि जून-जुलै दरम्यान झिम्बाब्वे येथे होणाऱ्या स्पर्धेनंतर स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *