हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेट पुन्हा तोटय़ात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ नोव्हेबर । हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटला पुन्हा एकदा तोटा झाल्याची बाब समोर आली आहे. सप्टेंबर तिमाहीअखेर कंपनीचा एकंदर तोटा 561 कोटी रुपयांवर पोहचला असल्याचे समजते. परिणामी कंपनीपुढचे संकट अधिक गडद झाले आहे.

याआधी मागच्या वर्षी समान तिमाहीत हवाई कंपनीला 112 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. याउलट जुलै-सप्टेंबर कालावधीत तोटय़ात वाढच झाल्याचे दिसले आहे. तोटा वाढल्याने तो कमी करण्याचे आव्हान येत्या काळात कंपनीला पेलावे लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत कंपनीला तब्बल 729 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

उत्पन्न वाढले

सप्टेंबरच्या तिमाहीदरम्यान कंपनीने 1 हजार 538 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न पदरात पाडून घेतले आहे. जे एक वर्ष आधी समान अवधीत 1 हजार 292 कोटी रुपये इतके होते. तिमाहीदरम्यान कंपनीचा खर्च 2 हजार 100 कोटी रुपयांवर राहिला होता.

बोलकी आकडेवारी

@ जुलै-सप्टेंबर 2021 561 कोटी तोटा

@ जुलै-सप्टेंबर 2021 112 कोटी तोटा

@ जुलै-सप्टेंबर 2021 1 हजार 538 कोटीचे उत्पन्न

@ जुलै-सप्टेंबर 2021 2 हजार 100 कोटींचा खर्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *