पोलीस भरती परीक्षा ; कॉपी बहाद्दर ; परीक्षेसाठी मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ नोव्हेबर । पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस शिपाई भरती पूर्व लेखी परीक्षा आज पार पडली. परंतु, एका कॉपी बहाद्दराला पोलिसांनी गेटवरच पकडल आणि चक्क मास्कमधून मोबाईल सारख डिव्हाईस पोलिसांनी जप्त केले आहे. मास्कच्या आत बॅटरी, कॅमेरा आणि सिम कार्ड होत. तो पोलिसांना फसवून आत जाण्याच्या अगोदर त्याला पकडण्यात आले. ही घटना हिंजवडी येथील ब्लू रिच या सेंटरवर समोर आली. त्यामुळे हा मुन्नाभाई पॅटर्न झाला असता अस पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायाच्या ७२० जागांच्या भरतीसाठी ८० सेंटरवर लेखी परीक्षा परीक्षा झाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयातील ७२० जागांसाठी ऐकून १ लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.

कॉपी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी भरारी पथक नेमण्यात आले होते. यावेळी व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आले. दरम्यान, लेखी परीक्षेच्या पूर्वी परीक्षार्थींना आतमध्ये सोडत असताना एकाने चक्क मास्कमध्ये मोबाईल डिव्हाईस बनवून आणले होते. मास्कमध्ये सिमकार्ड, बॅटरी, कॅमेरा हे सापडलं असून त्यात वायरिंग करण्यात आली आहे. त्यामधून इतर दुसऱ्या व्यक्तीला संवाद साधता येतो की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्याचे इतर साथीदार देखील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तो परीक्षार्थी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला असून तो पळून गेला आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *