IND vs NZ : तिसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचं सावट?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी कोलकाता इथल्या ईडन गार्डन्सवर तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. भारताने या मैदानावर चार टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात दोन सामने जिंकले आहेत. एक सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला, तर एक सामना इंग्लंडकडून हरला. मात्र आजच्या सामन्यात पाऊस पडला तर…

भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही. कोलकातामध्ये हवामान सामान्य असणार आहे. दिवसाचे तापमान 32 अंशांच्या आसपास राहील. त्याचबरोबर आर्द्रताही 59 टक्के राहील. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 9 किमी राहील. सायंकाळनंतर तापमान 22 अंशांपर्यंत खाली येऊ शकतं.

कोलकात्यात आज संध्याकाळी 5 वाजता सूर्यास्त होणार असून लवकरच दव पडू शकतं. ईडन गार्डन हे फलंदाजांसाठी उत्तम आहे आणि दव असल्याने संघाला नंतर फलंदाजी करणं सोपं होईल.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: टिम साउदी (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, एडम मिल्ने, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टिम सीफर्ट आणि ईश सोढी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *