महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ नोव्हेंबर । हल्ली वाढत्या वयाची लक्षणे लपवण्यासाठी बाजारात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. वयवाढीची लक्षणे चेहऱ्यावर लवकर दिसू लागतात, पण वाढणाऱ्या वयाचे शरीरावर दिसणारे परिणाम कमी करायचे असतील तर आहारात या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
प्रदूषण, ताणतणाव, व्यसन याचे दुष्परिणाम वयवाढीपूर्वीच त्वचेवर दिसू लागतात. याशिवाय आजकाल हाय प्रोसेड फूड, मीठ, सॅच्युरेटेड फॅटयुक्त आहारामुळे त्वचा सुरकुतलेली दिसू लागते. साधारणत: पन्नाशीनंतर हा त्रास प्रकर्षाने जाणवू लागतो. योग्य आहारामुळे ही समस्या टाळता येऊ शकते. या खाद्यपदार्थांमुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते. त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होते. हे पदार्थ अँण्टीएजिंगचेही काम करतात. यामुळे पन्नाशीनंतर दिसणाऱ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी दिसू लागतात.
ब्ल्यूबेरी
अत्यंत चविष्ट असणारी ब्ल्यूबेरी आरोग्यासाठी गुणकारी आहे.ब्ल्यूबेरीमध्ये जीवनसत्त्व सी आणि अँण्टीऑक्सीडंट हे गुण असतात. यामुळे वजन कमी राहण्यास मदत होते. वाढत्या वयामुळे पेशींचे होणारे नुकसान टाळता येते.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, चांगले फॅट, अँण्टीऑक्सीडंट आणि शरीरासाठी पोषक असणारी भरपूर जीवनसत्त्वे असतात. कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. नियमित पालेभाज्या खाल्ल्यामुळे तुम्ही शरीर निरोगी राहते. पन्नाशीनंतर पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीरावरील वाढत्या वयाची लक्षणे कमी दिसू लागतात.
सुकामेवा
बदाम, काजू, अक्रोड, ब्राजील नट्स यासारखा सुकामेवा खाल्ल्याने शारीरिक फायदा होतो. यामध्ये असलेले फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे या घटकांमुळे पन्नाशीनंतर वाढलेले वजन घटवण्यासाठी मदत होते. तसेच मधुमेह असलेल्यांनी सुकामेवा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ह्रदयाचे आरोग्यही उत्तम राहते. चयापचयाशी संबंधित आजारांपासूनही रक्षण होते.