महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ नोव्हेंबर । काडेपेटीनंतर आत पार्लेजीनेही आपल्या वस्तूंची किंमत वाढवण्याचे ठरवले आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले आहे.पार्लेजी कंपनीच्या ग्लुकोज बिस्किटांच्या किमतीत 6 ते 7 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसेच रस्कच्या (टोस्ट) किमतीत 5 ते 10 आणि केकच्या किमतीत 7 ते 8 टक्के किंमतीने वाढ झाली आहे.
कंपनीने बिस्किटांच्या किमतीत जरी वाढ केली असली तरी ग्राहकांना तेवढ्याच किंमती बिस्किट मिळणार आहे. त्याचे कारण कंपनीने 20 रुपयांहून अधिक असलेल्या बिस्किट आणि इतर उत्पादनांची किंमत वाढवली असली तरी उत्पादनांच्या वजनात घट केली आहे.
म्हणून किंमती वाढवल्या
बिस्किट आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने या किंमती वाढवल्याचे कंपनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षात साखर, खाद्य तेलांच्या किमतीत 50-60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच दरवाढीचा निर्णय घेतल्याचे अधिकार्यांनी म्हटले आहे.