महाराष्ट्र 24 – मुंबई
राज्यसभेच्या जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 मार्च आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासह फौजिया खान याही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शरद पवार दुपारी 2 वाजता विधान भवनात अर्ज दाखल करतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक उद्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संध्याकाळी पार पाडणार आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत.