महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली –
देशाच्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला ‘मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’ या रेटिंग एजन्सीने पुन्हा एकदा झटका दिला. एजन्सीने महिनाभरात दुसर्यांदा देशाच्या विकासदराचा अंदाज घटवला. चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 5.3 टक्के राहील, असा अंदाज मुडीजने वर्तवला आहे. विकासदराच्या या घसरणीमुळे देशाची अर्थव्यवस्था नजिकच्या काळात तरी डोके वर वाढण्याची चिन्हे नाहीत.
कोरोना विषाणूच्या फैलावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. आधीच ढेपाळलेली हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची अवस्था कोरोनाने आणखीनच बिकट करून टाकली आहे. त्यामुळे मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने महिनाभरात दुसऱयांदा विकासदराचा अंदाज घटवला. मुडीजने याआधी 17 फेब्रुवारीला विकासदराचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांवर घटवला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा झटका देत यंदाचा विकासदर 5.3 टक्क्यांवर येईल, असे म्हटले. कोरोनाला वेळीच न रोखल्यास विकासदर थेट 5 टक्क्यांवर घसरेल, अशी धोक्याची घंटाही मुडीजने वाजवली आहे.