१६ मार्चनंतर मुंबईकरांना जाणवणार कडक उन्हाळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – मुंबई
मुंबईकर सध्या पुन्हा एकदा दिलासादायक तापमानाचा अनुभव घेत आहेत. मंगळवारीही कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी होते. सांताक्रूझ येथे ३०.५, तर कुलाबा येथे ३०.४ अंश कमाल तापमान नोंदवले गेले. किमान तापमानात वाढ होऊन सांताक्रूझ येथे २१.१, तर कुलाबा येथे २२.० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. मात्र, अजूनही सकाळच्या वेळी तीव्र उन्हाची जाणीव व्हायला सुरुवात झालेली नाही. उन्हाळ्याची जाणीव १५ किंवा १६ मार्चनंतर होऊ शकते आणि त्यावेळी मुंबईचे तापमान ३४ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

मंगळवारी दुपारी वाऱ्यांचा वेग नसल्याने दुपारी काही प्रमाणात उकडा जाणवला. मात्र, नंतर समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही उकाड्याची जाणीव नियंत्रणात आली. येत्या ४८ तासांपर्यंत असे दिलासादायक तापमान अनुभवता येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात हळुहळू वाढ होईल, असे प्रादेशिक हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईव्यतिरिक्त राज्यभरात कमाल तापमानाचा पारा अजूनही सरासरीपेक्षा खाली आहे. पुण्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी कमी होते. पुण्याच्या तापमानाचा पारा ३०.६ अंशांवर होता. नाशिक येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा ७ अंशांनी कमी होते. नाशिकचे कमाल तापमान २७.४ अंश होते. तर गोंदिया येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी कमी नोंदले गेले. गोंदियाचे कमाल तापमान २७ अंश होते. दिवसभरात सर्वात जास्त कमाल तापमान मंगळवारी सोलापूर येथे ३६.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *