एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरुच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचार्‍यांचा संप आजही सुरुच आहे. संपकरी कर्मचार्‍यांवर एसटी महामंडळाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाने आतापयर्ंत 8 हजार 195 कर्मचार्‍यांवर निलंबनाची तर 1 हजार 827 जणांवर सेवासमाप्तीची कारवाई केली आहे. मंगळवारी महामंडळाने 610 कर्मचारी निलंबित केले तर रोजंदारीवरील 80 जणांची सेवासमाप्ती केली.

राज्य सरकारने कर्मचार्‍यांंना पगारवाढ देऊ केली आहे.तरीदेखील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.प्रशासनाने कारवाई सुरु केली असली तरी कर्मचारी त्यास दाद देत नाहीत. मंगळवारी 19 हजार 86 कर्मचारी महामंडळात कामावर रुजू झाले. परंतु त्यामध्ये प्रशासकीय कर्मचार्‍यांंचीच संख्या जास्त आहे.चालक-वाहकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांंच्या आधारे महामंडळाने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपयर्ंत 960 एसटी राज्यातील विविध मागार्ंवर चालविल्या.आजही संपात 73 हजार 180 कर्मचारी सहभागी आहेत. तर मार्गस्थ एसटीवर दगडफेकीच्या घटना आजही सुरुच आहेत.

संपकाळात राज्यभरात काही निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बस काही प्रमाणात सुरू आहेत. या बसेसच्या माध्यमातून गेल्या 10 दिवसांत एसटीला तब्बल 4 कोटी रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळाला आहे. दादर-पुणे, बोरीवली-ठाणे-पुणे या मार्गावर दर तासाला एक याप्रमाणे 35 शिवनेरी बस गेली 10 दिवस सुरळीत सुरु आहेत.

नाशिक-शिवाजीनगर (पुणे), सातारा-स्वारगेट (पुणे) आणि शिवाजीनगर- औरंगाबाद या मार्गावर 60 शिवशाही बस नियमित सुरू आहेत. या सर्व बस गेल्या काही वर्षांपासून महामंडळाने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतल्या आहेत. असाच प्रयोग कोल्हापूर-पुणे, पुणे-जळगाव-धुळे या मार्गावर देखील करण्याचा प्रयत्न महामंडळ करीत आहे.

संपात सहभागी झालेल्या कायमस्वरूपी कर्मचार्‍यांना निलंबित केल्यानंतर आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणारआहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचार्‍यांना निलंबनाची नोटीस बजावून आरोपपत्र दाखल केले होते.त्यांना 15 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश होते. परंतु मुदत उलटूनही काही कर्मचार्‍यांनी अद्यापही उत्तर न दिल्याने आता बडतर्फीची नोटीस देण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे.त्यानुसार येत्या तीन-चार दिवसात ही कारवाई होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *