कोरोनाच्या कॉलर ट्यूनला असे करा बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- कोरोना व्हायरसचा आतापर्यंत भारतातील 50 पेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. या व्हायरसपासून बचावासाठी व जागृकता पसरविण्यासाठी सरकार आणि आरोग्य संस्था प्रयत्न करत आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी देखील या व्हायरसबाबत जागृकता पसरविण्यासाठी कॉलर ट्यून जारी केली आहे. मात्र या कॉलर ट्यूनला अनेकजण वैतागले आहेत.

कोणालाही कॉल केल्यानंतर सर्वात प्रथम कोरोना संबंधी कॉलर ट्यून वाजत असल्याने लोक वैतागले आहेत. त्यामुळे ही कॉलर ट्यून बंद करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. जर तुम्हालाही ही या कॉलर ट्यूनपासून सुटका हवी असल्यास, तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल.

तुम्ही कोणालाही कॉल केल्यावर कोरोना संदर्भात कॉलर ट्यून सुरू झाल्यानंतर 1 अथवा # दाबा. यानंतर कॉलर ट्यून बंद होईल व त्वरित रिंगचा आवाज ऐकू येईल. मात्र ही पद्धत सर्वच कंपन्यांच्या नंबरवर काम करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *