महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । राज्यात इतरत्र ठिकाणी झालेल्या कालच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं, त्यामुळे हिंगोली आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. एका पाठोपाठ येणारी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा ची मालिका शेतकऱ्याना उद्ध्वस्त करून टाकत आहे. खरीप हंगाम हातचा निघून गेला, रब्बी हंगामाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीने लाईट बंद केली, आणि आता अवकाळी पावसाचे आगमन होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस म्हणजेच ५ डिसेंबरपर्यंत मराठवाड्यासह राज्यात असंच तापमान राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबादसह जालना, बीड , लातूर, उस्मनाबाद, परभणी, हिंगोली ,नांदेड आदी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील तसेच शीत वाऱ्यांमध्ये येत्या काही दिवसात अधिक वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Keep watch on east coast weather from IMD for coming days for severe weather likely, due to likely formation of Cyclonic Storm…🌀🌀 https://t.co/8LxgqvDdBx
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 2, 2021
कोकण विभाग आणि विदर्भातील तुरळक ठिकाणे वगळता किमान तापमानाचा पारा डिसेंबरच्या प्रत्येक ठिकाणच्या सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत चढा आहे. विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी नोंदवले गेल आहे. तर मराठवाड्यात १७ ते १९ अंशांदरम्यान आहे. मराठवाड्यातही सरासरीच्या तुलनेत पारा चढा आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये १५ ते २० अंशांदरम्यान किमान तापमानाचा पारा नोंदला गेला.
राज्यातील पर्जन्यमान
गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर येथे ६९, महाबळेश्वर येथे ९२, मालेगाव येथे ५५, नाशिक येथे ६३.८, पुणे येथे ७५.४, सांगली येथे ५७.८ तर सातारा येथे ९२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डहाणूमध्ये २४ तासांत सर्वाधिक ११४.४ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला.