आंध्र आणि ओडिशा किनारपट्टीवर ‘जवाद’ चक्रीवादळ उद्या धडकणार, अशी आहे तयारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । पूर्वेकडील किनारपट्टीवरील राज्यांवर आता ‘जवाद’ चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर ४ डिसेंबरला सकाळी धडकेल, अशी शक्यता असून तेव्हा चक्रीवादळाची गती १०० किमी प्रति तास राहू शकते. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मान्सून परतल्यानंतर पहिल्यांदा हे चक्रीवादळ येत आहे. मे महिन्यातील ‘यास’ आणि सप्टेंबरमधील ‘गुलाब’नंतर हे या वर्षातील तिसरे चक्रीवादळ असून ते पूर्वेच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांच्या तयारीचा आढावा घेतला.

अशी आहे तयारी
– कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत.
– ओडिशात रेल्वेने पूर्व किनाऱ्यावर ९५ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.
– हवामान विभागाने ओडिशाच्या गंजम, पुरी, गजपती आणि जगतसिंहपूरसाठी रेड अलर्ट, तर कटक, नयागड, खुर्दा, कंधमाल, रायगड, केंद्रपाडा आणि कोरापुटसाठी आॅरेंज अलर्ट जारी केला आहे. जाजपूर, भद्रक, मलकानगिरी आणि बालासोर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
– मासेमारांना २ ते ५ डिसेंबरपर्यंत समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *