आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट, सातारा जिल्हा बँकेंचं अध्यक्षपद राजेंकडे?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ डिसेंबर । सातारा जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक पार (Satara district central co operative bank eletion) पडली. त्यानंतर आता सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांची शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत चर्चा केली आहे. इतकेच नाहीतर आपल्याला अध्यक्षपद मिळावे अशी इच्छाही शिवेंद्रराजेंनी शरद पवारांकडे व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे.गुरुवारी शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छूक असल्याचं शिवेंद्रराजेंनी त्यावेळी अजित पवारांना म्हटल्याचंही वृत्त समोर आलं आहे.

अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार आणि शरद पवारांकडे इच्छा व्यक्त केली आहे. तर या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळेच आपला पराभव झाला असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात हे पहावं लागेल.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara District central co operative bank election) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं. तसेच आपल्या पराभवामागचं कारणही त्यांनी सांगितलं. माझा गाफीलपणा नडला ही वस्तुस्थिती आहे अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *